Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून करवली त्यांचे त्याने अवलंबन केले; ती त्याने सोडली नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 असे असले तरी नबाटचा मुलगा यराबाम ज्याने इस्राएलास पाप करायला लावले, त्याच्या पापास तो चिकटून राहिला. ती त्याने सोडली नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तरीपण, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएली लोकांना जे पाप करावयाला लावले, त्या पापास तो चिकटून राहिला; त्याने ती पापे सोडली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 3:3
20 Iomraidhean Croise  

एवढे झाले तरी यराबामाने आपला दुष्ट मार्ग सोडला नाही; त्याने उच्च स्थानांचे याजक सगळ्या लोकांतून नेमले; आपण उच्च स्थानांचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यांना त्याने समर्पित केले.


यराबामाने जी पातके स्वत: केली व इस्राएलांकडून करवली त्यामुळे परमेश्वर इस्राएलांचा त्याग करील.”


पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुराचरण केले आहेस; मला सोडून तू अन्य देव व ओतीव मूर्ती केल्या आहेत; अशाने तू मला चिडवून संतप्त केले आहे आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.


परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याने आपल्या बापाचे अनुकरण केले; त्याच्या बापाने इस्राएलांकडून जे पाप करवले त्याच पापाच्या मार्गाने तोही चालला.


त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले; त्याने यराबामाचे अनुकरण केले व जे पातक त्याने इस्राएलाकडून करवले त्या पातकांच्या मार्गाने तो चालला.


नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.


परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली होती ती त्याने सोडली नाहीत; त्यांप्रमाणे तो चालला.


परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाच्या हातून जी पापकर्मे करवली त्यांचे अवलंबन त्याने केले; व ती त्याने सोडून दिली नाहीत.


तरी यराबामाच्या घराण्याने जी पापकर्मे केली व जी त्याने इस्राएल लोकांकडून करवली त्या पापकर्मांप्रमाणे ते चालले; शोमरोनात अशेरामूर्तीही राहिल्या होत्या.


परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडून दिली नाहीत.


परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने आमरण सोडली नाहीत.


त्याने आपल्या वाडवडिलांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत.


त्याने इस्राएलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले; तेव्हा लोकांनी नबाटपुत्र यराबाम ह्याला आपला राजा केले; त्या यराबामाने इस्राएलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करवले.


यराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले; त्यांनी ती पातके सोडून दिली नाहीत.


शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.


मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदाला पाप करायला लावले, एवढेच नव्हे तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले.


मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्च स्थान इस्राएलाकडून पाप करवणारा नबाटपुत्र यराबाम ह्याने बांधले होते, ती वेदी व ते उच्च स्थान त्याने पाडून टाकले; ते उच्च स्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व अशेरामूर्ती जाळून टाकल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan