Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 बेथेलातल्या संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 2:3
17 Iomraidhean Croise  

ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.


त्यानंतर संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्याला म्हणाला, “मला मार.” पण तो मनुष्य त्याला मारायला कबूल होईना.


यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले.


यरीहोतील संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.”


संदेष्ट्यांचे पन्नास शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले; आणि ते दोघे यार्देनेतीरी उभे राहिले.


एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गार्‍हाणे केले; ती म्हणाली, “तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे.”


अलीशा पुन्हा गिलगाल येथे गेला तेव्हा देशात दुष्काळ पडला होता, आणि संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले असताना त्याने आपल्या सेवकाला सांगितले, “चुलीवर मोठे बहुगुणे ठेवून संदेष्ट्यांच्या शिष्यांसाठी शाकभाजी रांध.”


गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने आपणास असे सांगायला पाठवले आहे की, ‘एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत; त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी व दोन पोशाख द्या.”’


संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलीशाला म्हटले, “पाहा,आम्ही आपणासमोर राहत आहोत ते स्थळ फार अपुरे आहे.


नंतर अलीशा संदेष्ट्याने संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकाला बोलावून सांगितले, “कंबर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ-गिलाद येथे जा.


पाहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले ह्या आम्हांला सीयोननिवासी सेनाधीश परमेश्वराने इस्राएलात चिन्हे व उत्पात अशी ठेवली आहेत.


तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबरांच्या झाडांची निगा राखणारा आहे.


“मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.


तो आपल्या लोकांवर2 प्रीती करतो; त्याचे सर्व पवित्र जन तुझ्या हाती आहेत; ते तुझ्या पायाशी बसले आहेत; त्यांनी तुझी वचने ग्रहण केली आहेत.


मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील.


तेव्हा शौलाने दाविदाला पकडून आणण्यासाठी जासूद पाठवले. संदेष्ट्यांचे मंडळ भाषण करीत आहे व शमुवेल त्यांच्यापुढे उभा आहे असे शौलाच्या त्या जासुदांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्या ठायी संचरला व तेही भाषण करू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan