Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे; तर तू येथेच थांब.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडणार नाही.” मग ते बेथेल येथे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.” परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 2:2
17 Iomraidhean Croise  

त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल (देवाचे घर) असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते.


राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन दोन सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे; हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.”


त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसर्‍याची दान येथे स्थापना केली.


जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती तिच्यावर स्वतःच्याच मनाने ठरवलेल्या आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने होमबली अर्पण केले; त्याने इस्राएल लोकांसाठी हा सण स्थापला आणि वेदीवर यज्ञबली हवन करून अर्पण केला.


तो तेथून वरती बेथेलकडे चालला; तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, “अरे टकल्या, वर जा.”


एलीया त्याला म्हणाला, “अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे तर तू येथे थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते यरीहोस गेले.


एलीया त्याला म्हणाला, “परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवत आहे. तू येथेच थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते दोघे पुढे चालले.


तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” तेव्हा तो उठून तिच्यामागून चालला.


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.


तेव्हा हन्ना म्हणाली, “माझे स्वामी! आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती तीच स्त्री मी आहे.


दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अबनेर ह्याला विचारले, “अबनेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे?” अबनेर म्हणाला, “महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही.”


तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan