Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि परमेश्वराच्या मंदिरात त्याला सहा वर्षे तिच्याजवळ लपवून ठेवले होते. इकडे अथल्येने देशावर राज्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात सहा वर्षे लपून राहिले. आणि यहूदावर अथल्याचे राज्य होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत तो व त्याच्या दाईस याहवेहच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 11:3
7 Iomraidhean Croise  

तरी योराम राजाची कन्या व अहज्याची बहीण यहोशेबा हिने अहज्याचा पुत्र योवाश ह्याला त्या वधायच्या राजपुत्रांतून चोरून नेले आणि त्याला व त्याच्या दाईला बिछाने ठेवण्याच्या कोठडीत लपवून ठेवले; त्याला अथल्येच्या दृष्टिआड केल्यामुळे त्याचा वध झाला नाही.


सातव्या वर्षी यहोयादाने हुजरे आणि गारदी ह्यांच्यातल्या शतपतींना बोलावणे पाठवले; त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणून त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्याकडून आणभाक करवून त्यांना तो राजपुत्र दाखवला.


देवाच्या मंदिरात त्याला त्यांच्याबरोबर सहा वर्षे लपवून ठेवले होते; तेव्हा अथल्येने देशावर राज्य केले.


मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत चालतात.


ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले.


आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो; दुराचारी संपन्न झाले आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.”’


मग त्याने अफ्रा येथे आपल्या बापाच्या घरी जाऊन आपले भाऊ म्हणजे यरुब्बालाचे सत्तर मुलगे ह्यांची एकाच खडकावर कत्तल केली; तरी यरुब्बालाचा सर्वांत धाकटा योथाम हा वाचला, कारण तो लपून राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan