Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहाबाचे सत्तर पुत्रपौत्र शोमरोनात राहत असत. येहूने इज्रेल येथील वडील जनांपैकी जे अधिकारी होते त्यांना आणि अहाबाच्या पुत्रांचे पालन करणे ज्यांच्याकडे होते त्यांना पत्रे लिहून शोमरोनास पाठवली; त्यांत असे म्हटले होते :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शोमरोनात अहाबाला सत्तर पुत्र होते. शोमरोनातील अधिकारी आणि वडिलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. व इज्रेलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 10:1
14 Iomraidhean Croise  

कारण बेथेलातली वेदी आणि शोमरोन नगरातल्या उच्च स्थानांवरील सर्व मंदिरांविरुद्ध जे उद्‍गार त्याने परमेश्वराच्या वचनानुसार काढले त्यानुसार अवश्य घडून येणार.”


त्याने शेमर ह्याच्याकडून शोमरोन डोंगर दोन किक्कार1 रुपे देऊन घेतला; त्या डोंगरावर त्याने एक नगर वसवले आणि त्या वसवलेल्या नगराला त्या डोंगराचा मूळचा मालक शेमर ह्याच्या नावावरून शोमरोन असे नाव दिले.


अम्री आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, आणि त्याला शोमरोन येथे मूठमाती दिली, आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र अहाब राजा झाला.


“अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”


ती आपल्या मालकिणीला म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.”


त्याने अहज्याचा शोध लावला; त्याला त्याच्या लोकांनी पकडले; तो शोमरोन येथे लपून राहिला होता; त्यांनी त्याला येहूकडे नेऊन त्याचा वध केला. त्याला मूठमाती दिली; ते म्हणाले, “जो यहोशाफाट परमेश्वराला जिवेभावे शरण गेला त्याचा हा पुत्र.” अहज्याच्या घराण्यात राज्य करण्यास समर्थ असा कोणी उरला नाही.


तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन.


मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? ह्यांना मी प्रसवलो आहे काय? ‘जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहेस, त्या देशाकडे, तान्ह्या बाळाला सांभाळून नेणार्‍या पालक-पित्याप्रमाणे मी ह्यांना उराशी धरून घेऊन जावे’ असे तू मला कसे सांगतोस?


तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे तू न्यायाधीश व अंमलदार नेमावेस; त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.


इज्रेल, यकदाम व जानोह;


त्याला तीस मुलगे होते, ते तीस गाढवांवर स्वारी करत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात.


त्याला चाळीस मुलगे व तीस नातू होते. ते सत्तर गाढवांवर स्वार होत. त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.


गिदोनाला स्वतःचे सत्तर मुलगे झाले, कारण त्याला पुष्कळ बायका होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan