Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्यावर राजाने पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन एलीयाकडे पाठवले. एलीया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वतशिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे की, ‘तू खाली उतरून ये.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर अहज्याने आपला एक सरदार पन्नास मनुष्यांसह एलीयाकडे पाठवला. सरदार एलीयाकडे वर गेला, जिथे एलीया एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या (संदेष्ट्या) राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर राजाने आपल्या एका सेनाधिकार्‍याला पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी एलीयाहकडे गेला जो एका डोंगराच्या शिखरांवर बसलेला होता आणि त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘खाली या!’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 1:9
22 Iomraidhean Croise  

तेव्हा ती एलीयाला म्हणाली, “हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का?”


आपला देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्या धन्याने आपला शोध करण्यासाठी जेथे लोक पाठवले नाहीत असे एकही राष्ट्र किंवा राज्य उरले नाही; तो अमुक ठिकाणी नाही असे त्यांनी येऊन सांगितले म्हणजे एलीया त्यांना आढळला नाही अशी शपथ तो त्या त्या राज्यास व राष्ट्रास घ्यायला लावी.


ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.


मग अहाब खाण्यापिण्यासाठी वरती गेला. इकडे एलीया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.


तेव्हा ईजबेलीने जासूद पाठवून एलीयाला बजावले की, “संदेष्ट्यांच्या जिवाच्या गतीसारखी तुझ्या जिवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत.”


इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “महाराजांनी असे बोलू नये.”


तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोमरोनाला माघारी गेला.


मग ती चालत कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहचली. तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी ह्याला म्हणाला, “ती पाहा, शूनेमकरीण;


आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.


मग अमस्या आमोसाला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर;


कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते;


“अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?”


काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली.


मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या,


इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती.


हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभूजी, ‘आकाशातून अग्नी पडून’ त्यांचा ‘नाश व्हावा’ म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय?”1


आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला.


शौलास ही बातमी लागली तेव्हा त्याने दुसरे जासूद पाठवले, तेही तसेच भाषण करू लागले. शौलाने तिसर्‍यांदा जासूद पाठवले. तेही भाषण करू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan