त्यांनी त्याला सांगितले, “एका मनुष्याने आम्हांला वाटेत गाठून सांगितले की, ‘ज्या राजाने तुम्हांला पाठवले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, परमेश्वर म्हणतो तू एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्न करायला माणसे पाठवली ती इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय? तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस, तू अवश्य मरशील.”’