Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलीया तिश्बी ह्याला म्हणाला, “ऊठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदांना जाऊन गाठ आणि विचार, ‘तुम्ही एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करायला चालला आहात, ते इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “ऊठ, राजा अहज्याने शोमरोनाहून आपले काही दूत रवाना केले आहेत, त्यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग, ‘इस्राएलात देव नाही काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारायला जात आहा?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राज्याच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 1:3
21 Iomraidhean Croise  

ह्याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सीदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबाचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिलकोम ह्यांच्या भजनी लागले आहेत; ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत आणि शलमोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाहीत.


एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


पुष्कळ दिवस लोटल्यावर, तिसरे वर्ष लागले तेव्हा एलीयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “जा, अहाबाच्या दृष्टीस पड; मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे.”


संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे.


तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला; तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, “ऊठ, हे खा.”


परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ, हे खा; कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे.”


इकडे एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,


अहज्या हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला; त्याने जासुदांना अशी आज्ञा केली की, “तुम्ही जाऊन एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करा की मी ह्या दुखण्यातून बरा होईन काय?”


त्यांनी त्याला सांगितले, “एका मनुष्याने आम्हांला वाटेत गाठून सांगितले की, ‘ज्या राजाने तुम्हांला पाठवले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, परमेश्वर म्हणतो तू एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्‍न करायला माणसे पाठवली ती इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय? तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस, तू अवश्य मरशील.”’


ते म्हणाले, “त्याच्या अंगात केसांचा झगा होता व त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता.” तो म्हणाला, “तो एलीया तिश्बीच.”


नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे; तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा.”


इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलीशा ह्याने ऐकले, तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, “तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्राएलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल.”


यहूदात देव प्रकट झाला आहे; इस्राएलात त्याचे नाव थोर आहे.


ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?


जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात;


तसेच यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते की, “त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकार्‍याच्या साहाय्याने भुते काढतो.”


इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”


आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan