२ राजे 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 एलीयाने त्या पन्नासांच्या नायकाला म्हटले, “मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “जर मी देवाचा मनुष्य (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करून टाको.” तेव्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्याच्या पन्नास जणांना भस्म केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 एलीयाहने सेनाधिकार्याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले. Faic an caibideil |