Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हांला भरपूर प्रमाणात देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 9:8
28 Iomraidhean Croise  

अमस्याने देवाच्या माणसाला विचारले, “मी शंभर किक्कार रुपे इस्राएलच्या सैन्यास देऊन चुकलो आहे त्याच्यासंबंधाने मी काय करू?” देवाच्या माणसाने उत्तर दिले, “तुला ह्याहूनही अधिक देण्याची परमेश्वरास ताकद आहे.”


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.


एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो.


जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात.


तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;


रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.


यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस1 ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2


ख्रिस्त माझ्या द्वारे बोलतो आहे ह्याचे प्रमाण तुम्हांला पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिमान आहे;


इतकेच केवळ नाही तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची उत्सुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्ही करत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळ्यांनी त्याला नेमले.


ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.


तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था, व आमच्यावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे.


म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.


आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.


जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार्‍या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे,


मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता2 त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी.


तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हांला स्थिर करो.


म्हणून जर कोणी त्यांपासून दूर राहून स्वत:ला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.


ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


आपल्या लोकांनी आपल्या अगत्याच्या गरजा पुरवल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.


हे वचन विश्वसनीय आहे, आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे; ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत;


प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan