Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी; मात्र ती कृपणतेने न देता उदार अंत:करणाने द्यावी; म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी जाहीर केली होती, ती जमा करून तयार ठेवावी, म्हणून तुमच्याकडे माझ्या अगोदर येण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. मी येईन तेव्हा तुमची देणगी तयार असेल आणि हे निदर्शनास येईल की, तुमच्यांवर सक्ती केली आहे म्हणून नव्हे तर स्वेच्छेने तुम्ही दान देत आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 म्हणून मला असे वाटले, हे आवश्यक आहे की, बंधूंना अशी विनंती करावी की त्यांनी प्रथम तुमची भेट घ्यावी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार उदारतेने देत असलेल्या देणगीची व्यवस्था पूर्ण करावी. तेव्हा ती एक मुक्तहस्ताने दिलेली भेट अशी असेल, असंतुष्टतेने देणार्‍यासारखी ती नसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 9:5
11 Iomraidhean Croise  

तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच; कारण देवाने माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्वकाही आहे.” याकोबाने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली.


नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीत इस्राएलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे; तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा.”


आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.


ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा.


तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे;


हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.


मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.


ती त्याला म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या.” तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले.


मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी.


दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहूदाचे वडील ह्यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हांला ही भेट पाठवली आहे”;


Lean sinn:

Sanasan


Sanasan