Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण या सेवेचे काम केवळ पवित्रजनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात, केवळ इतकेच नव्हे, तर तिच्याद्वारे देवाचे अधिकाधिक आभार मानले जातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 म्हणजे तुमच्या या सेवेमुळे केवळ प्रभूंच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यास साहाय्य होते असे नाही तर परमेश्वराप्रती उपकारस्तुती ओसंडून वाहू लागते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 9:12
10 Iomraidhean Croise  

तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करावे; असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हांला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकारस्तुती करावी.


कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दु:खे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते.


त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी;


तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही;


तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;


मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार?


Lean sinn:

Sanasan


Sanasan