Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 जो ‘पेरणार्‍याला बी’ पुरवतो व ‘खाण्याकरता अन्न’ पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आता जो पेरणार्‍याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खायला अन्न पुरवतो, तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे पीक वाढवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कारण तो पेरणार्‍यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 9:10
16 Iomraidhean Croise  

आपल्यादेखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनीचा नाश का व्हावा? आम्हांला व आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हांला अन्न द्या, आम्ही व आमच्या जमिनी ह्यांच्यावर फारोची मालकी होवो; आम्हांला बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडायच्या नाहीत.


दुर्जन वेतन मिळवतो ते बेभरवशाचे असते; परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खातरीचे असते.


सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नकोस; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.


पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्‍यास बीज, खाणार्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत,


तुम्ही आपणांसाठी नीतिमत्त्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्वराने येऊन तुमच्यावर नीतिमत्त्वाची वृष्टी करावी ह्याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.


माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.


ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते.


हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.


जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून?


(कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.)


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.


मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.


आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;


आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी,


Lean sinn:

Sanasan


Sanasan