Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्‍यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 मी तुमच्याकरिता आदेश देत नाही, तर दुसऱ्यांच्या कळकळीच्या तुलनेत तुमच्या प्रीतीचा खरेपणा तपासून पाहण्यासाठी मी हे सांगत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 8:8
19 Iomraidhean Croise  

लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर1 असली, आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला सोडू नये.


कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूकडून झाली आहे तो मी आपले मत सांगतो.


तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो.


तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने; पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने,


ह्याविषयी मी आपले मत सांगतो; कारण हे तुम्हांला हितकारक आहे; तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे, तर अशी इच्छा करण्यासही केला.


म्हणून त्यांना तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुमच्या-विषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळ्यांसमक्ष दाखवा.


कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली; आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.


प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.


तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो.


आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ.


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan