Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पवित्रजनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हास विनंती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक विनंती केली की, यहुदियातील पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 8:4
27 Iomraidhean Croise  

आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”


कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.”


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही.


तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्‍चय केला की, यहूदीयात राहणार्‍या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे;


मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.


मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.


ह्यासाठी की, यहूदीयात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी,


आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करायची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा.


बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे; ते अखयाचे प्रथमफळ आहे, आणि त्यांनी आपणांस पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे.


तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही;


मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो.


तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan