Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 8:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तीताविषयी कोणी विचारील तर तो माझा साथी व तुमच्याकरता माझा सहकारी साथी आहे; आमच्या बांधवांविषयी म्हणाल तर ते मंडळ्यांचे जासूद, ख्रिस्ताचे भूषण असे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी व सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रेषित आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 तीतविषयी कोणी विचारील, तर तो माझा भागीदार व तुमच्या सेवेत माझा सहकारी आहे. त्यांच्याबरोबर येत असलेल्या आमच्या इतर बांधवांविषयी म्हणाल, तर ते ख्रिस्तमंडळ्यांचे प्रेषित, ख्रिस्ताचे वैभव असे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 8:23
20 Iomraidhean Croise  

तसेच शिमोनाचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नकोस; येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”


तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसर्‍या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणार्‍यापेक्षा थोर नाही.


पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.


मी तीतास विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने, सारख्याच चालीने चाललो नाही काय?


तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले;


तीताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणार्‍या देवाची स्तुती असो.


त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठवले आहे; सुवार्तेसंबंधी मंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे;1


इतकेच केवळ नाही तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची उत्सुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्ही करत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळ्यांनी त्याला नेमले.


त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसर्‍या एका बंधूला पाठवले आहे.2 त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे; आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.


ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा.


तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;


आणि तसेच हे माझ्या खर्‍या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.


एपफ्रास, आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्याकरता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकलात.


परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.


कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला.


देवपित्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो.


म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर.


आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात.


म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan