Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्याविषयी मी आपले मत सांगतो; कारण हे तुम्हांला हितकारक आहे; तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे, तर अशी इच्छा करण्यासही केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ह्याविषयी मी आपले मत सांगतो, कारण हे तुम्हास हितकारक आहे, तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 तुम्ही गेल्या वर्षी जे कार्य सुरू केले आहे, ते आता पूर्ण करावे, हे तुमच्या हिताचे आहे, असे माझे मत आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला इतकेच नव्हे तर तशा प्रकारचे कार्य करण्याची इच्छा बाळगण्यातही तुम्ही अग्रेसर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 या गोष्टीसंबंधाने जे तुमच्यासाठी योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतो: मागील वर्षी तुम्हीच असे होता की ज्यांनी प्रथम देण्यास आरंभ केला. इतकेच केवळ नव्हे, परंतु तशी इच्छाही बाळगण्यामध्ये तुम्ही पुढे होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 8:10
18 Iomraidhean Croise  

जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.


आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”


प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.”


तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो; मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन.


एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहूद्यांना मसलत दिली होती. पेत्र येशूला नाकारतो


“मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही.


आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.


“सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही; “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.


कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूकडून झाली आहे तो मी आपले मत सांगतो.


पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल; आणि मलाही देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.


प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.


ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा.


हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्‍यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.


कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली; आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.


मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.


चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan