२ करिंथ 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था ह्यांसंबंधाने आम्हांला सांगत असताना, तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि केवळ त्याच्या येण्यामुळे नाही, पण तो जेव्हा तुमची उत्कंठा, तुमचा शोक व तुमची माझ्याविषयीची तीव्र सदिच्छा ह्यांविषयी आम्हास सांगत होता तेव्हा तुमच्याबाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्याच्या केवळ येण्यामुळे नव्हे, तर तुम्ही त्याला कसे प्रोत्साहन दिले ह्याविषयी ऐकून मला आनंद झाला. मला भेटण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात, तुम्हांला किती खेद वाटतो व माझे समर्थन करण्यासाठी तुम्ही कसे तयार आहात, हे सर्व आम्हांला सांगत असताना तुमच्याविषयी त्याला जो आनंद झाला ते पाहून माझा आनंद द्विगुणित झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याच्या केवळ येण्याने नव्हे परंतु तुम्ही त्याचे जे सांत्वन केले त्यामुळेही, माझ्यासंबंधाने तुमची उत्सुकता, तुमचे अति दुःख, तुमची माझ्यावरील आस्था या सर्वगोष्टी त्याने मला सांगितल्या, तेव्हा माझा आनंद पूर्वीपेक्षाही ओसंडून वाहू लागला. Faic an caibideil |