Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मला तुमचा मोठा भरवसा आहे; मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पुरेपूर सांत्वन झाले आहे; आमच्यावर आलेल्या सर्व संकटांत मला आनंदाचे भरते आले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मला तुमचा मोठा विश्वास आहे व मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पूरेपूर समाधान झाले आहे आणि आपल्या सर्व दुःखात मी अतिशय आनंदीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 मी वारंवार तुमच्याविषयी बढाई मारतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. मी तुमच्याविषयी समाधानी आहे. आमच्यावर ओढवलेल्या दु:खात मी अतिशय आनंदित आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी अगदी मोकळेपणाने तुमच्याबरोबर बोलतो; मला तुमचा अतिशय अभिमान आहे. मी खूप उत्तेजित झालो आहे; आमच्या या सर्व दुःखात माझ्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 7:4
27 Iomraidhean Croise  

ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले.


इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर,


ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो;


त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हांला मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.


तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.


आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला, त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरवली तरी मला संकोच वाटणार नाही;


स्वतःला हिणवून मी हे बोलतो; तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).


जो देव आम्हांला सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो, आणि सर्व ठिकाणी आमच्या द्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रकट करतो, त्याची स्तुती असो.


तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो;


मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही; तर आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले.


म्हणून त्यांना तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुमच्या-विषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळ्यांसमक्ष दाखवा.


आणि त्यांची खातरी पटून प्रभूमधील बहुतेक बंधू माझ्या बंधनांमुळे उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगण्यास अधिक धीट झाले आहेत.


हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे.


तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;


तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे;


कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना?


परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.


ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटांत तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्यांबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वत: तुमची वाखाणणी करतो.


तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले; कारण, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे.


माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan