Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि तुम्ही सर्वांनी भीत भीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून आज्ञांकितपणा दर्शवला ह्याची तो आठवण करतो; म्हणून त्याला तुमच्याविषयी आत्यंतिक ममता आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुमच्या सर्वांच्या आज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून, कापत कापत, त्याचे कसे स्वागत केले याची त्यास आठवण होत असता तुमच्यासाठी त्याची ममता फारच फार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 आदरयुक्त भीतीने कंपित होऊन, त्याचे स्वागत करून आज्ञाधारकपणा तुम्ही सर्वांनी कसा दर्शविला, ह्याची तो आठवण करतो, म्हणून त्याचे तुमच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ज्या रीतीने भयाने व थरथर कापत तुम्ही सर्वांनी आज्ञांकितपणा दाखवून त्याचा स्वीकार केला, या सर्वगोष्टी आठवून, तुमच्याविषयीची त्याची प्रीती अधिक वाढली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 7:15
23 Iomraidhean Croise  

आपल्या भावासाठी योसेफाची आतडी तुटू लागली, कोठेतरी जाऊन रडावेसे त्याला झाले म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला.


तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका.” दुसरी स्त्री म्हणाली, “तो न माझा न तुझा, त्याचे दोन भाग करा.”


मग यहूदा व बन्यामीन ह्यांतील सर्व लोक तीन दिवसांच्या आत यरुशलेमेत एकत्र झाले; हे सर्व नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी घडले. सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले.


मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकांसंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला, ते सगळे माझ्याजवळ जमा झाले, व मी संध्याकाळच्या अर्पणसमयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो.


मला आठवण झाली की मी घाबरा होतो; माझ्या देहाला कंप सुटतो.


तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो; तुझ्या निर्णयांना मी भितो.


भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.1


माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला, तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.


स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही.


मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला,


आणि मी तअशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो.


हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे.


संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत.


दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा;


माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.


म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;


तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा;


ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका.


मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार?


Lean sinn:

Sanasan


Sanasan