२ करिंथ 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही; तर आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि तुमच्याविषयी त्याच्यापुढे मी जर अभिमान मिरवला असेल तर मला काही लाज वाटत नाही. पण आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याबरोबर सर्वकाही खरेपणाने बोलतो, त्याचप्रमाणे तीतापुढील तुम्हाविषयीचा आमचा अभिमान खरेपणाचा आढळला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी जो अभिमान बाळगला त्याबाबतीत तुम्ही मला अपमानित होण्याची वेळ आणली नाही, आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी सत्याला स्मरून बोललो, त्याप्रमाणे तीतबरोबर बोलताना आम्ही जो अभिमान व्यक्त केला तो खरा ठरला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मला तुमच्याबद्दल केवढा अभिमान आहे, हे मी त्याला सांगितले होते आणि तुम्ही मला मुळीच निराश केले नाही. जे काही आम्ही तुम्हाला सांगितले ते सर्व खरे होते, तसेच मी तीतापुढे काढलेले तुमच्याबद्दलचे अभिमानाचे शब्दही खरे ठरले आहेत! Faic an caibideil |