Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि देवाचे भय बाळगून आपण पूर्णपणे पवित्र होऊ या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्‍या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 7:1
48 Iomraidhean Croise  

त्याने त्यांना बजावून सांगितले की, “परमेश्वराचे भय बाळगून खर्‍या व निष्कपट मनाने असे करा.


तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.


परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.


हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


“मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल?


आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे.


परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.


ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.


आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या;


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


वस्त्र, त्याचा ताणा किंवा त्याचा बाणा किंवा चामड्याची कोणतीही वस्तू धुतल्यावर त्यावरील तो चट्टा नाहीसा झाला तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी म्हणजे ती शुद्ध होईल.


‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते.


ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’


‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.


अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.


शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली.


कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.


देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;2 म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.


त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.


ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.


कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.


शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.


स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,


म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक1 होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू;


म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे; ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू.


जरी आम्ही असे बोलतो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे.


देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.


तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा;


जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा.


निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.


जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.


जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan