Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 5:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 हे देवाचे कार्य आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेट घडवून आणण्याचे सेवाकार्य आमच्यावर सोपविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 5:18
29 Iomraidhean Croise  

जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, “तुझा देव राज्य करीत आहे” असे सीयोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.


मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.


इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणांतील कळपांतून दोनशे मेंढरांमागे एक कोकरू द्यावे; लोकांप्रीत्यर्थ प्रायश्‍चित्त करावे म्हणून अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही द्यावीत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


पण ज्या पापबलीचे काही रक्त दर्शनमंडपात पवित्रस्थानी प्रायश्‍चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.


ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ‘ह्या घरास शांती असो,’ असे प्रथम म्हणा.


आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.


देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.


योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.


येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे.


कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे, आणि सर्वकाही देवापासून आहे.


आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे.


अपुल्लोस कोण? आणि पौल कोण? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत; ज्याला-त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत.


तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत.


त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.


म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.


प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.


आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.


प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan