Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि तो सर्वांसाठी ह्याकरता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वत:करता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तो सर्वांसाठी ह्याकरता मरण पावला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मरण पावला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते सर्वांसाठी मरण पावले, म्हणून आता जे जिवंत आहेत त्यांनी यापुढे स्वतःसाठी जगू नये, तर जे त्यांच्यासाठी मरण पावले आणि पुन्हा उठले, त्यांच्यासाठी जगावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 5:15
41 Iomraidhean Croise  

तेव्हा नामान म्हणाला, “एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांच्या ओझ्याची माती द्या; कारण ह्यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही देवांना होमबली अर्पण करणार नाही की यज्ञही करणार नाही.


मी तुझ्याजवळून जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले, तेव्हा मी तुला म्हणालो, ‘तू आपल्या रक्तात लोळत आहेस तरी जिवंत राहा;’ असेच मी तुला म्हणालो.


मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन; तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”


तेव्हा तो मला म्हणाला, “वार्‍याला1 संदेश दे; मानवपुत्रा, वार्‍याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वार्‍या, तू चोहो दिशांनी ये व ह्या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.”


पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; नीतिमान तर आपल्या विश्वासाने1 वाचेल.


मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन; दूर देशात ते माझे स्मरण करतील; ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील.


ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.


जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.


कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?


हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला.


पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे.


कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.


कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.


तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवतो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.


ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.


त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो.


तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.


आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेलात, आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात.


म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा.


आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.


आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.


प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यांनुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे.


देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे; ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan