Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो; देवाला तर आम्ही प्रकट झालोच आहोत; आणि तुमच्या सदसद्विवेकबुद्धीतही प्रकट झालो आहोत अशी आशा मी धरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून आम्हास प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशी आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. परमेश्वर आम्हांला पूर्णपणे ओळखतो आणि तुमच्या अंतःकरणात तुम्ही मला चांगल्या प्रकारे जाणता, अशी आशा मी धरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 प्रभूची भीती बाळगणे हे काय आहे हे आपणास माहीत आहे, त्यामुळेच इतरांना वळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो! आम्ही कोण आहोत हे परमेश्वरापुढे स्पष्ट आहे आणि मी आशा धरतो की, तुमच्या विवेकबुद्धीनेही तुम्ही हे निश्चित जाणता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 5:11
39 Iomraidhean Croise  

मग त्यांनी कूच केले; आणि आसपासच्या नगरांतल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत.


त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते.


देवापासून येणार्‍या विपत्तीचा मला धाक असे; त्याच्या प्रभावापुढे माझे काही चालत नसे.


सर्वसमर्थाचे तीर माझ्या देहात शिरले आहेत, त्यांचे विष माझा जीव शोषून घेत आहे; ईश्वराकडून आलेली संकटे माझ्याविरुद्ध सज्ज झाली आहेत.


एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत;


तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?


तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे?


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


सीयोनेतील पातकी घाबरले आहेत. अधर्म्यांना कापरे भरले आहे. “भस्म करणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण राहील? सर्वकाळ पेटत राहणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण टिकेल?”


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा.


तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’


आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान यहूदीयमतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे गेले; त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले.


“हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो.”


तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे.


तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.


ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपर्‍यात घडलेले नाही.


तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्‍हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.


ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.


जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.


ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan