Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 आमचा छळ झाला, तरी आम्हांला टाकून देण्यात आले नाही. आमच्यावर प्रहार झाले, तरी आमचा विध्वंस झाला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 4:9
19 Iomraidhean Croise  

त्या मार्गांनी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला,1 तर तू ‘वर! वर!’ असेच म्हणशील; कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील.


“माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे, तरी माझ्याविरुद्ध त्यांचे काही चालले नाही.


माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.


कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.


हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.


ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.


कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल.


अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल.


अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,


‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील;


ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?


तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले;


ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल;


तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan