Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत. आम्ही फसवेगिरी करत नाही; देवाच्या वचनाचा विपर्यास होऊ न देता सत्य जाहीर करून प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीला देवासमक्ष आवाहन करतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 4:2
16 Iomraidhean Croise  

तो पुन्हा म्हणाला, “दुसर्‍यांदा तसेच करा”; तेव्हा लोकांनी दुसर्‍यांदा तसेच केले. तो म्हणाला, “तिसर्‍यांदा तसेच करा”; आणि त्यांनी तिसर्‍यांदा तसेच केले.


कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.


तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे.


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही; हे आम्ही तुमच्यासंबंधाने सर्व लोकांत व सर्व प्रकारे प्रकट केले.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो; देवाला तर आम्ही प्रकट झालोच आहोत; आणि तुमच्या सदसद्विवेकबुद्धीतही प्रकट झालो आहोत अशी आशा मी धरतो.


गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे;


मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही; तर आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले.


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan