Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 4:17
33 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे.


मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.


त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्‍हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.


तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्‍यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्‍यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.


तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील.


चला, माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.


रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.


हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही.


पण ती स्त्री भ्रष्ट झालेली नसून शुद्ध असली तर ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र होईल.


आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.


त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.


केवळ इतके कळते की, बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे.


म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;


कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो.


तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.


उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.


हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, “डोळ्यानहले नाही, कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या ‘मनात जे अले नाही, ते आपणावर प्रीत करणार्‍यांसाठी देवाने सिद्ध केल आहे;”


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे.


ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटांत तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्यांबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वत: तुमची वाखाणणी करतो.


तुमच्यावर संकट आणणार्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्‍या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,


ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो.


जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.


सर्वांचा शेवट जवळ आला आहे; म्हणून मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा;


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan