Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर ‘मांसमय अंत:करणरूपी पाट्यांवर’ ‘कोरलेले’, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात, असे तुम्ही दाखवून देता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 स्वतः ख्रिस्ताने हे पत्र लिहिले असून आमच्याद्वारे ते तुमच्याकडे पाठविण्यात आले. हे पत्र शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने दगडी पाट्यांवर नव्हे तर मानवी हृदयावर लिहिलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 3:3
35 Iomraidhean Croise  

हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”


माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?


माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा; मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो.”


परमेश्वराने मोशेबरोबर सीनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे दोन साक्षपट त्याला दिले.


मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला; त्या पाट्यांवर पुढच्या व मागच्या अशा दोन्ही बाजूंना लिहिले होते.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून तयार कर म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन.


दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव;


ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे;


तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.


मी त्यांना एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन;


मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.


शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.”


अपुल्लोस कोण? आणि पौल कोण? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत; ज्याला-त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत.


त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो.


जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की ‘मोशेच्या चेहर्‍याचे तेज’ नाहीसे होत चालले असूनही इस्राएल लोकांना जर त्याच्या चेहर्‍याकडे टक लावून पाहवेना,


देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’


कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,


परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”


कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील.


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


यहोशवा म्हणाला, “जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी गिर्गाशी, अमोरी व यबूसी ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल हे येणेप्रमाणे तुम्हांला कळून येईल :


इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,


पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही : ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो,


थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत,’ आणि ‘ज्याचे पाय सोनपितळेसारखे’ आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो :


स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही; जो पहिला व’ शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो :


सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत व सात तारे आहेत तो असे म्हणतो : तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस.


लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो :


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”


फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो :


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan