२ करिंथ 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण, आरशातून प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करतो आणि पवित्र आत्म्याकडून येत असलेले हे वैभव आपल्याला प्रभूबरोबर अधिकाधिक एकरूप करीत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत. Faic an caibideil |