Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 3:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परंतु त्यांची मने कठीण झाली; कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते; ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 परंतु त्यांची मने खरोखर कठोर झाली आणि आजतागायत जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढलेले आढळते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताशी जोडला जातो तेव्हा हे आच्छादन दूर केले जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु त्यांची मने आता मंद झाली व जुना करार वाचला जात असताना आजही तेच आच्छादन आहे. ते फक्त ख्रिस्तामध्येच दूर केले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 3:14
34 Iomraidhean Croise  

त्यांना दिसेनासे व्हावे म्हणून त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येवो; तू त्यांची कंबर सदा खचव.


सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन, तो ह्या डोंगरावरून उडवून देत आहे.


अशांना कळत नाही, समजत नाही; त्यांचे डोळे लिंपले असल्यामुळे त्यांना दिसत नाही; त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही.


त्याचे जागल्ये आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत; ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत.


आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.


ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.”


“मूर्ख, बुद्धिहीन लोकहो, हे आता ऐका; तुम्हांला डोळे असून दिसत नाही. तुम्हांला कान असून ऐकू येत नाही.


“मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.


त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.


येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.


पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा!


“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.”


जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.


पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्‍यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”


कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”


तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;


आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते;


त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan