Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्यापासून शिफारसपत्रे पाहिजेत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास, दुसर्‍यांप्रमाणे, तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 आम्ही पुन्हा स्वतःची वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रे पाहिजेत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आम्ही पुन्हा स्वतःची प्रशंसा करण्यास प्रांरभ केला आहे काय? आणि इतर काही लोकांसारखे शिफारसपत्र तुम्हासाठी व तुम्हापासून घेण्याची गरज आहे का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 3:1
13 Iomraidhean Croise  

नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले; तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले.


किंख्रियातील मंडळीची सेविका - आमची बहीण फीबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो;


तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवतो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.


मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहचवण्याकरता मी पाठवीन.


माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला; आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे.


कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे.


कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही; ते तर स्वतःच स्वत:शी आपले मोजमाप करतात व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करतात; हा शहाणपणा नाही.


कारण स्वत:ची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंतीस1 उतरतो.


आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला, त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरवली तरी मला संकोच वाटणार नाही;


मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो.


तुमच्याशी आम्ही प्रतिवाद करत आहोत असे इतका वेळ तुम्हांला वाटले असेल; पण आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहोत. प्रियजनहो, हे सर्व तुमच्या उन्नतीसाठी आहे.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हांला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो; अशा हेतूने की, जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हांला उत्तर देता यावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan