Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही, म्हणून माझ्या जिवाला चैन पडेना. मग तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 माझा बंधू तीत हा मला सापडला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास निघून गेलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 परंतु माझा बंधू तीत हा मला भेटला नाही म्हणून माझ्या जिवाला चैन पडेना. तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु माझा बंधू तीत, तिथे मला भेटला नाही, त्यामुळे माझ्या मनाला शांती नव्हती. म्हणून मी तेथील लोकांचा निरोप घेतला व तडक मासेदोनियाकडे गेलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 2:13
16 Iomraidhean Croise  

मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला.


मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.


आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले.


कारण यरुशलेमेतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते.


मी तीतास विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने, सारख्याच चालीने चाललो नाही काय?


ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषेकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.


मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही; तर आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले.


तीताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणार्‍या देवाची स्तुती असो.


तीताविषयी कोणी विचारील तर तो माझा साथी व तुमच्याकरता माझा सहकारी साथी आहे; आमच्या बांधवांविषयी म्हणाल तर ते मंडळ्यांचे जासूद, ख्रिस्ताचे भूषण असे आहेत.


ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा.


नंतर चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्याबरोबर तीतालाही घेतले होते.


तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असताही त्यालादेखील सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही;


कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला.


देवपित्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan