Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 असो; मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठायी दार उघडले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवस शहरास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक द्वार उघडले गेले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 असो, मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी त्रोवस येथे आल्यावर माझ्यासाठी प्रभूने दार उघडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी त्रोवास शहरात ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यास आल्यावर, प्रभूंनी माझ्यासाठी द्वार उघडल्याचे मला आढळून आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 2:12
20 Iomraidhean Croise  

तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.


तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस गेलो;


मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसाला खाली गेले.


ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते.


पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून :


कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत.


दुसरे लोक जर तुमच्यावरच्या ह्या हक्काचा उपभोग घेतात तर तो आम्ही विशेषेकरून घेऊ नये काय? तथापि हा हक्क आम्ही बजावला नाही, एवढेच नव्हे, तर ख्रिस्ताच्या सुवार्तेला काही अडथळा करू नये म्हणून आम्ही सर्वकाही सहन करतो.


त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की, जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी.


जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!


कारण तुमच्यापर्यंत संबंध पोहचत नसल्यासारखे आम्ही मर्यादेचे अतिक्रमण करत नाही; कारण ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहचलोच आहोत.


कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हांला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे.


तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता तुम्हांला विनामूल्य सांगितली, हे मी पाप केले काय?


परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.


त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठवले आहे; सुवार्तेसंबंधी मंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे;1


ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, तुम्ही ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यांमुळे देवाचा गौरव होतो;


आणखी आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरता दार उघडावे;


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan