Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही कसोटीस उतरलेले आहोत, हे सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे दिसलो तरीही तुम्ही चांगले करावे म्हणून.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 13:7
25 Iomraidhean Croise  

याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा : “तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.


दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.


ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस ह्याला सलाम सांगा. अरिस्तबूलच्या घरातील माणसांना सलाम सांगा.


कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.


कारण ते म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.”


कारण स्वत:ची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंतीस1 उतरतो.


पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे.


कारण सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते.


जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.


तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत,


कारण आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य’, इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.


शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.


राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.


तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर.


प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan