Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्‍या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी फुगून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे सैतानाचा एक हस्तक माझ्यावर प्रहार करण्याकरिता ठेवण्यात आला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 12:7
25 Iomraidhean Croise  

याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली.


तो पनुएल (पनीएल) सोडून चालला असता सूर्योदय झाला; आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला;


तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.


तरीपण बाबेलच्या अधिपतींनी देशात घडलेल्या चमत्काराविषयी चौकशी करण्यास वकील पाठवले, तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्याला सोडून दिले.


परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नकोस.”


मग सैतान परमेश्वरासमोरून गेला; आणि त्याने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले.


त्यानंतर इस्राएल घराण्याच्या आसपासच्या द्वेष्ट्यांपैकी कोणी त्यांना बोचणारा कांटा व टोचणारी नांगी असे उरणार नाही; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले.


ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन.


पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील.


तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्‍क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले,


तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’


ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?”


ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत; आम्ही ठोसे खात आहोत, आम्हांला घरदार नाही.


कारण ते म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.”


तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो;


कारण कोणी तुम्हांला गुलामगिरीत लोटले, तुम्हांला खाऊन टाकले, तुम्हांला अंकित केले, स्वत:ला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.


तुम्हांला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हांला ठाऊक आहे;


असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्या बाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही; तसेच तो व त्याचे वंशज इस्राएल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील.


तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ.


त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा.


म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; ते तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हांला पाश होतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan