Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 मी मूढ बनलो. असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करावयाची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या परमश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही हलक्या दर्जाचा नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 अशा रीतीने प्रौढी मिरवायला लावून, मी स्वतःला मूर्ख बनविले आहे आणि तुम्ही मला तसे वागायला भाग पाडले आहे. खरेतर तुम्ही माझी प्रशंसा करावयास पाहिजे होती, जरी मी तुच्छ असलो तरी त्या “उच्च प्रेषितांच्या” तुलनेत मी कमी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 12:11
17 Iomraidhean Croise  

स्वमुखाने नव्हे, तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.


त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.”


मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.


पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे;


आमच्यावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते; आणि आम्हांला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दु:खे आम्ही सोसतो, ती सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळते.


माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे; आणि ते तुम्ही करतच आहात.


अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो.


चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुमच्यामध्ये प्रेषिताने करायची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखवण्यात आली.


कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही; मी खरे तेच बोलेन; तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये.


आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्यापासून शिफारसपत्रे पाहिजेत काय?


आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी, आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहोत.


कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.


मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी;


Lean sinn:

Sanasan


Sanasan