Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही; कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली; आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले, तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी स्वतःला सांभाळले व सांभाळेन!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि मी जेव्हा तुमच्याजवळ होतो आणि मला गरज पडली, मी कोणालाही ओझे झालो नाही, कारण मासेदोनियातून जे बंधू आले त्यांनी माझ्या गरजांची परिपूर्ती केली व माझे ओझे कोणत्याही प्रकारे तुम्हावर पडणार नाही आणि मी असेच पुढेही करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 11:9
16 Iomraidhean Croise  

माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी चाळीस शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवकदेखील लोकांवर अधिकार गाजवत, पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते.


आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता.


सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता.


मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही.


कारण यरुशलेमेतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते.


स्तेफना, फर्तूनात व अखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे; कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे.


तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत,


ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते.


तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;


आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसर्‍यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो.


बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे; तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रं-दिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.


त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan