Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 11:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 मी किती तरी प्रवास केला. पुरांमुळे आलेली संकटे, लुटांरूमुळे आलेली संकटे, माझ्या यहुदी देशबांधवांनी आणलेली संकटे, यहुदीतरांनी आणलेली संकटे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मी सतत प्रवास केले आहेत आणि नद्यांची संकटे, लुटारूंची संकटे, यहूदी लोकांची संकटे, गैरयहूदी लोकांची संकटे, शहरातील संकटे, गावातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या विश्वासणार्‍यांपासून संकटे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 11:26
35 Iomraidhean Croise  

पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.


तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले.


नंतर अंत्युखिया व इकुन्या येथून कित्येक यहूदी आले; त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले.


मग त्यांचा अवमान करून त्यांना दगडमार करण्याकरता परराष्ट्रीय व यहूदी आपल्या अधिकार्‍यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते.


पण पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपवल्यावर तो तेथून निघाला.


तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकातल्या यहूद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळवून चेतवले.


परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.


नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,


मग असे झाले की, अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहचला; तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले.


ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली.


म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळत आणि यहूद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोसत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे;


तेथे तीन महिने राहिल्यावर तो सूरिया देशात तारवातून जाणार होता, पण यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला, तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला.


असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.


आणि, मेहेरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.


तेव्हा बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी शिपायांनी मसलत केली;


ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?


आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घालतो?


मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत, “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.”


दिमिष्कात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकार्‍याने मला धरण्याकरता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता.


आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan