Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 11:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जसे बरेच लोक दैहिक गोष्टीविषयी अभिमान मिरवतात, तसा मी पण अभिमान मिरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 देहाला अनुसरून अनेक लोक प्रौढी मिरवितात, मग मी सुद्धा प्रौढी मिरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 11:18
13 Iomraidhean Croise  

आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत.


तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?


जे मी करतो ते करत राहीन; अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये, म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात, त्या बाबतीत त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे.


प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.


मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो.


परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.


तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.


कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan