Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 11:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 कारण असे लोक खोटे प्रेषित, फसविणारे कामकरी, ख्रिस्ताचे प्रेषित आहोत असा समज करून फसविणारे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 11:13
36 Iomraidhean Croise  

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.


जे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करू नका’ त्यांची वचने ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.


नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता;


तेव्हा काही जणांनी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.”


आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने (म्हणजे सुंता करून घ्यावी व नियमशास्त्र पाळावे असे सांगून) तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते.


तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.


ती दुसरी नाही; पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत.


आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;


ते लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे; तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात.


जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.


त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा.


लाघवी भाषणाने कोणी तुम्हांला भुलवू नये म्हणून हे सांगतो; कारण जरी मी देहाने दूर आहे,


ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या;


मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


‘तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले.


तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.


(तुझी कृत्ये,) तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे (तरी तू धनवान आहेस) आणि जे यहूदी नसताही स्वतःला यहूदी म्हणवतात, पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan