Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला, त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरवली तरी मला संकोच वाटणार नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण, प्रभूने आम्हास जो अधिकार दिलेला आहे, तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला आहे, ह्याविषयी मी काहीशी जास्तच प्रौढी मिरवली आहे, तरी मला संकोच वाटत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हा अधिकार प्रभूने तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला विकसित करण्यासाठी आम्हाला दिला आहे, आणि जरी मी त्याविषयी थोडाफार अभिमान दाखविला, तरी मला त्याची लाज वाटणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 10:8
12 Iomraidhean Croise  

आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहोत; तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.


कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.


असे की, मी तुम्हांला पत्राद्वारे भीती घालणारा आहे असा भास होऊ नये.


तुमच्याशी आम्ही प्रतिवाद करत आहोत असे इतका वेळ तुम्हांला वाटले असेल; पण आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहोत. प्रियजनहो, हे सर्व तुमच्या उन्नतीसाठी आहे.


कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही; मी खरे तेच बोलेन; तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये.


ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते ह्यासाठी की, जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये.


कारण सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते.


मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही; तर आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले.


मला तुमचा मोठा भरवसा आहे; मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पुरेपूर सांत्वन झाले आहे; आमच्यावर आलेल्या सर्व संकटांत मला आनंदाचे भरते आले आहे.


गलतीयातील मंडळ्यांना : मनुष्यांकडून नव्हे, किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले तो देवपिता, ह्यांच्या द्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या-बरोबरच्या सर्व बंधूंकडून :


ह्या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan