Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तुमच्या डोळ्यांपुढे आहे ते तुम्ही पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वत:विषयी भरवसा असेल तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वत:शी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी विश्वास असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तुम्ही बाह्य स्वरूप तेवढे पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत, असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल, तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुम्ही बाहेरील रूप पाहून न्याय करता. जर कोणाला असा भरवसा असेल की ते ख्रिस्ताचे आहेत, तर त्यांनी याबद्दल पुन्हा विचार करावा की जसे आम्ही ख्रिस्ताचे आहोत तसे तेही आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 10:7
21 Iomraidhean Croise  

आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;


त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.


वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”


माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो.


जर कोणी स्वत:ला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे.


पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.


आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.


मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? प्रभूमध्ये तुम्ही माझे काम नाही काय?


मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो, तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो;


देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.


ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (हे मी वेडगळासारखे बोलतो); श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे.


कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हांला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे.


मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो.


ख्रिस्त माझ्या द्वारे बोलतो आहे ह्याचे प्रमाण तुम्हांला पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिमान आहे;


आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हांला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो; अशा हेतूने की, जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हांला उत्तर देता यावे.


आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात.


आपण देवाचे आहोत; जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो; जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.


पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan