Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवाच्या सामर्थ्यशाली शस्त्रांनी तटबंदी जमीनदोस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 10:4
28 Iomraidhean Croise  

परमेश्वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”


मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरूज पडतील तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक उंच टेकडीवर झरे व ओहोळ होतील.


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?


मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता.


रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.


आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा.


आपल्याच खर्चाने शिपाईगिरी करतो असा कोण आहे? द्राक्षमळा लावून त्याचे फळ खात नाही, असा कोण आहे? कळप पाळून कळपाचे दूध सेवन करत नाही असा कोण आहे?


आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला, त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरवली तरी मला संकोच वाटणार नाही;


ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते ह्यासाठी की, जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये.


आम्ही स्वत: कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे;


ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.


सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने; आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी,


परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.


माझ्या मुला तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की, तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर;


ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.


विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्‍या घालण्यात आल्यावर ते पडले.


तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपापल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan