Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहचली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हास लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आम्ही प्रतिष्ठा मिरविली, तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला दिलेल्या सेवाकार्याच्या मर्यादेतच मिरवू. त्यात तुमच्यापर्यंत येऊन पोहचलेल्या आमच्या सेवाकार्याचा समावेश होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आम्ही मर्यादेच्या बाहेर प्रौढी मिरविणार नाही, तर जी सेवा परमेश्वराने आम्हास नेमून दिली आहे व जी मर्यादा परमेश्वराने आम्हास लावून दिली आहे, त्या मर्यादेतच आम्ही प्रौढी मिरवू आणि त्यात तुमचाही समावेश आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 10:13
12 Iomraidhean Croise  

तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे.


मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे.


न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन; लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकतील.”


एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला.


पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर, व त्यांचे शब्द दिगंतरी पोहचले.”


कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.


आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;


आणि दुसर्‍याच्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर


तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.


तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे.


प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan