२ करिंथ 10:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही; ते तर स्वतःच स्वत:शी आपले मोजमाप करतात व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करतात; हा शहाणपणा नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडूनच मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात हा शहाणपणा नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करतात व आपसांत एकमेकांशी तुलना करतात. हे सुबुद्धपणाचे नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जे स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याशी तुलना करण्याचे धैर्य आम्ही करीत नाही. ते स्वतःचे आपसात मोजमाप करतात व आपसातच तुलना करतात, ते शहाणे नाहीत. Faic an caibideil |
ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.