Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो, तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 मी पौल तुमच्यासमोर असताना तुमच्याशी लीनपणे व सौम्यतेने वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कठोरपणे वागतो, असे म्हटले जाते. मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 10:1
38 Iomraidhean Croise  

सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’


“सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.”


तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा : “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्‍याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही.


आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, “जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो; जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो.”


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


तरी मला देवापासून प्राप्त झालेल्या कृपेमुळे मी तुम्हांला आठवण देऊन थोडेबहुत अधिक धैर्याने लिहिले आहे;


आणि मी तअशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो.


आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत.


तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?


कारण ते म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.”


माझे मागणे असे आहे : आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात; असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये.


तुमच्या डोळ्यांपुढे आहे ते तुम्ही पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वत:विषयी भरवसा असेल तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वत:शी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत.


स्वतःला हिणवून मी हे बोलतो; तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).


मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.


अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वत:विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.


तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो;


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


मला तुमचा मोठा भरवसा आहे; मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पुरेपूर सांत्वन झाले आहे; आमच्यावर आलेल्या सर्व संकटांत मला आनंदाचे भरते आले आहे.


तुम्हांला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हांला ठाऊक आहे;


पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही.


ह्या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे.


म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;


तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे.


जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता, आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाहीत तर हे होईल.


मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम; ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.


हा माझा पौलाचा स्वदस्तुरचा लेख आहे; ते मी फेडीन; शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही.


तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,


प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.


मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यांकरता पात्म नावाच्या बेटात होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan