Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 तर असा बेत करताना मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय-नाही अशी धरसोड करता यावी म्हणून मी जी योजना करतो, ती स्वार्थी वृत्तीने करतो काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी हे बेत चंचलवृतीने केले काय? मी ऐहिक रीतीने माझ्या योजना करतो काय किंवा “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 1:17
14 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत; तिचे याजक पवित्रस्थान भ्रष्ट करतात, त्यांनी नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे.


तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.


तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.


तुम्ही देहबुद्धीने न्याय करता; मी कोणाचा न्याय करत नाही.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.


मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो; ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयांत घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकान्ती केली; नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते.


ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याचे इच्छिले; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले; परंतु सैतानाने आम्हांला अडवले.


माझ्या बंधूंनो, मुख्यत: शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची, किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका; तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला ‘होय’ म्हणायचे तर ‘होय’ म्हणा; ‘नाही’ म्हणायचे तर ‘नाही’ म्हणा.


त्यांनी अबीमलेखाला बआल-बरीथच्या घरातून सत्तर रुपये दिले; ह्या पैशांनी त्याने रिकामटेकड्या व बेदरकार लोकांना पदरी ठेवले व ते त्याच्याबरोबर चालायला लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan