Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 खरे तर आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या औदार्याने व प्रामाणिकपणाने वागलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 हे आम्हाला गर्वाचे कारण आहे: आमच्या सर्व व्यवहारात आमच्या विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की या जगात आणि तुमच्या संबंधात, आम्ही पवित्र आणि ईश्वरी प्रामाणिकपणाने भरलेले होतो. हे ऐहिक ज्ञानावर नव्हे तर परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहिल्यामुळे आम्ही करू शकलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 1:12
40 Iomraidhean Croise  

कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही.


तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन;1 तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्यासमोर मी समर्थन करीन.


तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.


मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.”


ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.


मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही; माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की,


कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.


कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन;


तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले.


ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवत्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.


कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.


म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.


तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.


हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्‍यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.


तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसर्‍यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.


तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा;


असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे;


तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात, व देवही आहे.


ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी.


सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव; शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे;


आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.


तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


ते सद्भाव धरून द्या, ह्यासाठी की, तुमच्याविरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणार्‍यांनी लज्जित व्हावे.


त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता ‘बाप्तिस्मा’ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan