Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ करिंथ 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करावे; असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हांला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकारस्तुती करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करता त्याप्रमाणे जो आशीर्वाद पुष्कळ जणांच्या प्रार्थनेमुळे आम्हांला मिळाला आहे, त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ लोक देवाचे आभार मानतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला मदत करावी. कारण जो कृपेचा अनुग्रह सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्हास मिळाला आहे, त्याबद्दल आमच्यावतीने अनेकजण परमेश्वराची स्तुती करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ करिंथ 1:11
15 Iomraidhean Croise  

तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्‍यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.


सर्वकाही तुमच्याकरता आहे, ह्यासाठी की, पुष्कळ जणांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी.


आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात, व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात.


कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे.


आणखी आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरता दार उघडावे;


बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.


बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा की, तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचा गौरव व्हावा.


त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल1 अशी मला आशा आहे.


आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan